महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने घवघवीत यश मिळवले असून एकूण 288 पैकी 207 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपद जिंकले. भाजपकडून घराणेशाहीला विरोध असल्याचा दावा केला जात असला तरी अनेक भाजप मंत्री आणि आमदारांच्या पत्नी, सून, मुलगी किंवा नातेवाईक बिनविरोध निवडून आले. या निकालांमुळे गावगाड्यातही घराणेशाहीचा जोर दिसून आला आहे, आणि आगामी महापालिका निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे अधिक गहन झाली आहेत.
घराणेशाहीचा जोर
